लग्नाच्या अफवांवर कंगना अखेर बोलली...


हिरॉइनच्या आयुष्याबद्दल नेहमी काही ना काही चर्चा होत असतात. गेल्या काही दिवसांत कंगना रनौटबाबतही असंच खूप काही बोललं जातंय. शेवटी कंगनालाच याबाबत बोलावंसं वाटलं. 'एवढ्यात लग्न करण्याचा माझा विचार नाही. मला आत्ता माझ्या करिअरकडे लक्ष द्यायचं आहे', असं ती म्हणाली. तिच्या जीवनावर चरित्रपट बनणार असल्याचीही केवळ अफवा असल्याचं सांगत, बायोपिक बनवण्यासाठी जे व्यक्तिमत्त्व लागतं त्यासाठी मी प्रयत्न करतेय असं तिनं म्हटलं आहे.